संस्थेविषयी
नंदुरबार हा खान्देशातील आदिवासी जिल्हा असून या अतिदुर्गम भागात दऱ्या-खोऱ्यात लोकांचे वास्तव्य आहे, या समुदायांतील सदस्यांच्या समस्यांचे उपचार करण्यासाठी आनंदवन व्यसनमुक्ती स्थापना केली असून केंद्रामार्फत सामाजिक व आरोग्यविषयक सेवा दिली जात आहे.
आरोग्यविषयक, व्यसनमुक्ती, नशामुक्ती इ. समस्यावर, वैद्यकीय उपचार करण्यासाठी तज्ञ मानसोपचार तज्ञ समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ता, समन्वयक व टिम उत्तम काम करीत आहेत.
"होत आहे उध्वस्त आमची, तरुण ही मंडळी
नशेच्या ह्या चक्रामध्ये, गुंतली जी सगळी."
-स्मिता हळदणकर
प्रवेश माहिती
प्रवेश प्रक्रिया आणि काही महत्त्वाच्या नियमांविषयी सविस्तर
-
व्यसनाधीन व्यक्तीला व्यसनमुक्ती केंद्रातील किमान 30 दिवसांचे वास्तव्य अपेक्षित आहे.
-
जर दाखल केलेल्या रुग्णालय इतर आजारावर बाहेरील हॉस्पिटल मधील काही वैद्यकीय सेवा लागल्यास त्याचा खर्च स्वतंत्ररित्या करावा लागेल.
-
प्रवेश प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचे बदल करण्याचे सर्व अधिकार आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र स्वतःजवळ राखून ठेवलेले आहेत.
-
रुग्ण अल्कोहोल विथड्रॉल स्थितीमध्ये असल्यास रुग्ण या स्थितीमधून बाहेर पडेपर्यंत रुग्णासोबत नातेवाईकांनी राहणे बंधनकारक नाही. गरज पडल्यास नातेवाईकांना बोलवल्यास वेळेवर येणे बंधनकारक राहील.
-
प्रवेश घेतेवेळी रुग्णाचे आधार कार्ड देणे बंधनकारक राहील.
उत्कृष्ट सेवा
व्यसनाधिनता हा एक मानसिक आजार आहे. व्यसनी व्यक्तीला त्याचा आजार समजावून सांगून, यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना व्यसन सोडायची प्रेरणा भाग्यचैतन्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दिले जाते.
औषधोपचार
सुरुवातीच्या आठवड्यात व्यक्तीला व्यसनी पदार्थ न मिळाल्याने त्रास होतो त्याला Withdrawal असे म्हणतात. अशा वेळी व्यवस्थित औषधोपचार होणे खूप गरजेचे असते. तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हे औषधोपचार केले जातात.
समुपदेशन (Counselling)
व्यसनाधीन लोकांना समुपदेशन खूप गरजेचे असते. केंद्रामध्ये समुपदेशनद्वारे रुग्णांच्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली जाते. संवाद, सुसंवाद करून त्यांचा हरवलेला आत्मविश्वास परत मिळवला जातो.
कौटुंबिक सल्ला
व्यसनाच्या आधिन गेल्यामुळे रुग्ण हा कुटुंबापासून दूर जातो. त्यामुळे आवश्यकतेनुसार त्यांना वैयक्तिक, कौटुंबिक, तसेच वैवाहिक सल्ला देऊन त्यांचे समुपदेशन करून त्यांना निरोगी सुखी व समाधानी आयुष्याचे स्वप्न दाखवले जाते.
मानसिक उपचार
व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे रुग्ण हा कुटुंबापासून, समाजापासुन, मित्रमंडळीपासुन दूर लोटला जातो. त्यामुळे तो अधिकच मानसिकरीत्या खचून जातो. केंद्रामध्ये समुपदेशन करून त्याला मनाने सुदृढ, समाधानी बनवले जाते.
ग्रुप थेरपी
केंद्रामध्ये रुग्णांचे ग्रुप तयार करून त्यांचे वेगवेगळे उपक्रम घेतले जातात. त्यांचा एकमेकांसोबतचा संवाद वाढवून त्यांचे सामाजिक कौशल्य विकसित केले जाते. त्यांना वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास प्रेरित केले जाते.
प्रार्थना
आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दररोज रुग्णांकडून एकत्रितपणे प्रार्थना म्हणून घेतली जाते. हि खास व्यसनाधीन रुग्णांसाठी लिहिलेली प्रार्थना आहे. या प्रार्थनामध्ये जो सार आहे त्यामुळे कळत नकळत रुग्णांचे मत परिवर्तन होते.
संपर्क माहिती
आनंदवन व्यसनमुक्ती उपचार आणि मार्गदर्शन केंद्र नंदुरबार ता.जि.नंदुरबार
पद्मावती नगर हाँटेल गौरव पँलेस शेजारी नंदुरबार ता.जि.नंदुरबार ४२५४१२