सेवा व सुविधा
“व्यसन हा एक मानसिक आजार आहे. तो उपचाराने बरा होतो. म्हणून कोणतेही व्यसन सुटू शकत असा विश्वास सर्वाच्या मनात निर्माण करणारे आमचे आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र नंदुरबार येथे सुरू असून या केंद्रामार्फत आजपर्यंत अनेक रूग्ण बरे होऊन आपआपल्या कुटूंबात व्यसनमुक्त होऊन आनंदाने संसार करत आहेत. आणि व्यसनाधीन व्यक्तीना व्यसनमुक्ती साठी संदेश देत आहेत.
-
व्यसनमुक्ती कशी होते :-
आनंदवन व्यसनमुक्ती उपचार आणि मार्गदर्शन केंद्रात MBBS मानसउपचार नशाकडून रूग्णाची आरोग्य तपासणी करून औषधउपचार व ट्रिटमेंट दिली जाते यानंतर मानसिक समुपदेशन यात रूग्ण आणि रूग्णाच्य कुटूंबाचेही समुपदेशन करून रूग्ण आणि त्याच्या परीवारात प्रबळ इच्छाशक्ती निर्मान केली जाते. रूग्णांसाठी विविध थेरपीचा वापर करण्यात येतो.
-
रूग्णासाठी सेवा सुविधा :-
आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रात दाखल होणाऱ्या व्यक्तीसाठी उत्तम निवास व्यवस्था, त्यासोबत टि व्ही, वृत्तपत्र, संगणक, चेस, कॅरम, टेबल, व्यायामसाठी साहित्य, सकारात्मक विचार व संदेश देण्यासाठी उत्तम ग्रंथालय, व्यसनाचे दुष्परिणाम समजावयला प्रोजेक्टच्या माध्यमातून विविध व्ही. डी. ओडिओ द्वारे माहीती, खेळ, व्यायाम, योगा, धार्मिक मंदिरावर सहली, व्यसनामुक्त झालेल्या व्यक्तीचे अनुभव, वेगवेगळ्या क्षेत्रातील यशवंत व्यक्तीशी चर्चा बौध्दीक खेळ , समुपदेशक, संवाद, कोशल्य, गीत गायन, कार्यक्रम् इ. सुविधा केंद्रामार्फत दिल्या जातात.
-
तज्ञ व सेवाभावी व अनुभवी स्टॉप :-
आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रातील प्रोजेक्ट मॅनेजर , समाजशास्त्र विषयात MA, M.Phil. Ph.D असून समाजभुषन, समाजरत्न, आदर्शशिक्षक, उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी, महात्मा फुले, बहजन रत्न, आदर्श दाम्पंत्य पुरस्कार सन्मानीत, राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी कल्याण , पौढ शिक्षक, व्यसनमुक्ती , समाजसेवा इ. कामाचा प्रदिर्घ अनुभव संपन्न आहेत.
-
व्यसनमुक्ती केंद्राचे डॉ. चंद्रकांत जोशी ,(न्यरोसायकियाट्रिस्ट) MBBS/DPM असून मानसउपचार क्षेत्रात व व्यसनमुक्ती क्षेत्रातील प्रदिर्घ अनुभव संपन्न डॉक्टर आहेत.
-
समन्वयक श्री. नितीन सनेर व सौ. शितल नुक्ते MA – MSW पदव्युत्तर शिक्षक घेतले असून सेवाभावी संस्थामधील कार्याचा प्रदिर्घ अनुभव आहेत. बालकल्याण, बालन्याय, व्यसनमुक्ती, एडस् निमुर्लन, कोरोना लसीकरण, बालसंगोपण इ. क्षेत्रातील अनुभव संपन्न आहेत.
-
समुपदेशक कु. अर्चना बागुल MA मानसशास्त्र व समुपदेशनाचा अनुभव आहे.
-
परिचारिका कु. सोनल पाडवी M.S.c व N.M. असून परीचारीका क्षेत्रातील अनुभव संपन्न आहे. सर्वच स्टॉफ उच्चशिक्षित असून आपल्या क्षेत्रातील कामाचा अनुभव संपन्न व्यक्ती आहेत योग्यशिक्षक श्री. संजय पाटील, दररोज रूग्णाकडून योगा करून उत्तम आरोग्यासाठी योगा प्रशिक्षण देतात.
-
रूग्णासाठी वैयक्तीक लक्ष :-
आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झालेल्या रूग्णांकडे आमचा स्टॉफ 24 तास वैयक्तीक लक्ष देत असतो. रूग्णासाठी औषध पाणी, नास्ता, भोजन, आरोग्याची काळजीसाठी वॉर्डबॉय श्री. सुभाष कोकणी व श्री जयपाल वळवी सतत परीश्रम घेऊन रूग्णांची देखभाल करण्यास रूग्णाविषयी माहीती कुटूंबाला देऊन त्यांना ही आधार देतात.
-
व्यसनमुक्ती केंद्रातील कार्यक्रम :-
व्यसनमुक्ती सप्ताह, नशामुक्ती भारत, तंबाखू मुक्त कार्यशाळा, ट्रक चालकासाठी व्यसनमुक्तीबाबत जनजागृती, समतापर्व निमित्त व्यसनमुक्ती कार्यशाळा, आरोग्य सेवक व पोलिस बांधवांसाठी व्यसनमुक्ती अभियान , राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक साठी युवकासाठी व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन, बस चालक आणि वाहकासाठी व्यसनाच्या दुष्परिनामावर चर्चासत्र, नगरपालिका सफाई कामगाराकरीता व्यसनमुक्तीबाबत चर्चासत्र, बाजार, बसस्थानक, रेल्वेस्टेशन, यात्रा प्रसंगी व्यसनमुक्तीबाबत पथनाट्य सादरीकरण, व्यसनांच्या अंमली पदार्थांचा होळी, व्यसनमुक्ती रॅली, व्यसनमुक्ती बाबत पोस्ट प्रदर्शना नशामुक्ती/व्यसनमुक्ती प्रोजेक्ट द्वारे VDO दाखविणे. कनिष्ठ महाविद्यालय आणि वरीष्ठ महाविद्यालयतील युवकासाठी व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन कार्यशाळा, ग्रामीण आणि शहरी भागातील गर्दीच्या ठिकाणी व्यसनमुक्तीचा संदेश देणाऱ्या पुस्तिका वाटप कार्यक्रम.
-
व्यसनमुक्ती केंद्रातील रूग्णांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम :-
आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झालेल्या रूग्णांमधील सुप्त गुणांचा शोध घेऊन त्यांच्यात विविध कौशल्यांचा विकास करण्यासाठी गीतगायन, चित्रकला, पेटींग, लेखन कला, हस्तकला, शिल्पकला, संगणक, स्वयंपाक कला, शिवणकाम, शेतीकाम, इ. कलागुणाचा विकास करण्यासाठी वरील क्षेत्रातील तज्ञामार्फत मार्गदर्शन केले जाते.
-
व्यसनमुक्ती केंद्रातील रूग्णांसाठी योगा प्रशिक्षण :-
आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रातील रूग्णांसाठी दररोज योग-प्राणायम-सुर्यनमस्कार व योगासंबधीच्या विविध प्रकारांची माहीती श्री. संजय पाटील (योगशिक्षक) रूग्णांना देत असतात. यामुळे रूग्णांचे एकाग्रता, शांतता, स्वास्थता व मानसिक शाती लाभते.
-
व्यसनमुक्ती केंद्रातील ग्रंथसंपदा :-
आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झालेल्या रूग्णामध्ये सर्वागिण घेण्यासाठी – वैयक्तीक विकास, नापास मुलांचे प्रगती पुस्तक, गीता, रामायण, संविधान, करिअर आयकॉन, यशाचा मार्ग, यशस्वी उद्योजक अग्निपंख, वैदिक गणित, स्पर्धा परीक्षा, मुल्यनिष्ठित समाज, अंधश्रध्दा, भारतीय कामगार, आधुनिक भारताचा इतिहास इ. ग्रंथ संपदा केंद्रात आहेत.