top of page
संस्थेची पार्श्वभूमी
भाग्यचैतन्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राची
सुरुवात २०२० साली झाली. २०२० पासून व्यसनाने त्रस्त असलेल्या अनेक व्यक्तींना मानसिक आजारातून आणि शारीरिक, कौटुंबिक, आर्थिक इत्यादी समस्येतून बाहेर काढण्यात आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राने मोलाची कामगिरी पार पाडली आहे. असंख्य लोकांचे आशीर्वाद आणि शुभेच्छाची शिदोरी बरोबर घेऊन आम्ही काम करीत आहोत.
नंदुरबार येथे व्यसनमुक्ती केंद्र नसल्यामुळे व्यसनाधीन लोकांना उपचाराकरिता जिल्ह्याच्या बाहेर जावे लागत होते. ही गैरसोय लक्षात घेऊन आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र नंदुरबार शहरात उभारण्यात आले आणि आतापर्यंत केंद्रामार्फत ५०० पेक्षा जास्त लोक व्यसनमुक्त झाले आहेत.
bottom of page